
Parner : पतसंस्थेत जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी घेतल्या. मात्र, ठेवींची मुदत संपूनही ठेवीची रक्कम परत न करता ठेवीदार व त्याच्या कुटुंबीयांची एक कोटी १० लाख आठ हजार ३२३ रुपयांची फसवणूक केल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत घडली. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक, विशेष वसुली अधिकारी, अशा २२ जणांवर ५ नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत ठेवीदार भाऊसाहेब लिंबाजी थोरात (रा. पिंप्री जलसेन, ता. पारनेर, हल्ली रा. खराडी, पुणे) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाने ठेवींवर ज्यादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून ठेवी घेतल्या. त्या ठेवींची मुदत संपल्यावर फिर्यादी संस्थेत पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांना व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी चुकीची उत्तरे दिली.
|
Pune : पार्थ पवार जमीन प्रकरणात नवा ट्विस्ट; Index-II मधील मोठी गडबड उजेडात – विजय कुंभारांचा दावा |
रोख रक्कम शिल्लक नाही, भरणा येणार आहे. काही दिवसांत पैसे देऊ, असे सांगत टोलवाटोलवी केली.फिर्यादीने याबाबत पदाधिकारी व संचालक मंडळाशी संपर्क साधला असता त्यांनीही वेगवेगळी कारणे सांगत वेळ मारून नेली. अनेकदा पाठपुरावा करूनही ठेवींची एक कोटी १० लाख आठ हजार ३२३ रुपये पतसंस्थेकडून देण्यास टाळाटाळ करण्यात आली. संस्थेकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भाऊसाहेब थोरात यांनी ५ नोव्हेंबर रोजी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर नारायण कवाद, उपाध्यक्ष रामदास बाबुराव लंके, संचालक बाळासाहेब गणाजी लामखडे, मच्छिंद्र जिजाबा लंके, नामदेव हरिभाऊ पठारे, रायचंद खंडू गुंड, भाऊसाहेब विठोबा लामखडे, संतोष बन्सी येवले, भास्कर तुकाराम शेळके, राजेंद्र भागा लाळगे, प्रकाश शिवराम कवाद, वसंत जानकू बुचडे, मुकुंद रामचंद्र निघोजकर, शंकर रामचंद्र वराळ, संजय बबन सोनवणे, पुष्पा प्रकाश पांढरकर, विजया लहू वागदरे, अविनाश पंढरीनाथ गांढरे, रामदास बाबुराव रोहिले, व्यवस्थापक दिलीप पोपटराव वराळ, पिंप्री जलसेन शाखाधिकारी संपत गणाजी लामखडे, विशेष वसुली अधिकारी व तज्ज्ञ संचालक संतोष बाबुराव साबळे या २२ जणांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

