क्रिकेट वर्ल्ड कप T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानचा संघ पोहचला सुपर 8 मध्ये, आता भारताला देणार आव्हान

AFG vs PNG T20 World Cup 2024 : भारतात मागील वर्षी पार पडलेल्या एकदिवसीय विश्वकरंडकात दमदार कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वकरंडकातही आपली धडाकेबाज कामगिरी कायम ठेवली. फझलहक फारूकी, नवीन उल हक यांची प्रभावी गोलंदाजी व गुल्बदीन नेब याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने शुक्रवारी पहाटे झालेल्या लढतीत पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघावर सात विकेट वा २९ चेंडू राखून विजय मिळवला.

या विजयासह अफगाणिस्तान संघाने अव्वल आठ संघांच्या फेरीत प्रवेश केला. या गटातून पुढल्या फेरीत पोहोचणारे दोन संघ निश्चित झाले आहेत. अफगाणिस्तानसह यजमान वेस्ट इडीज सघाने पुढल्या फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तान आता 20 जूनला भारतासोबत भिडणार आहे.
पीएनजी संघाचा डाव ९५ धावांमध्ये आटोपला. अफगाणिस्तानने हे आव्हान १५.१ षटकांत तीन फलंदाज गमावत ओलांडले. रहमानुल्लाह गुरबाज (१२ धावा) व इब्राहिम झादरन (०) या सलामीवीरांकडून निराशा झाली; पण गुल्बदीन नैब याने ३६ चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावा फटकावत अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले, मोहम्मद नबी याने नाबाद १६ धावा करीत त्याला साथ दिली.

USA ने इतिहास रचला, पहिल्यांदाच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये प्रवेश; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

त्याआधी अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पीएनजीची अवस्था १३व्या षटकांत सात बाद ५० धावा अशी झाली होती. किपलिन दोरिया याने २७ धावांची आणि अॅले नाओ याने १३ धावांची खेळी केल्यामुळे पीएनजी संघाला १५ धावांपर्यंत मजल मारता आली. फझलहक फारूकी याने १६ धावा देत तीन फलंदाज बाद करीत सामनावीराचा मान संपीडन केला. नवीन उल हक याने ४ धावा देत दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक पापुआ न्यू गिनी १९.५ षटकांत सर्व बाद २५ धावा (किपलिन दोरिंगा २७, अॅले नाओ १३, फझलहक फारूकी ३/१६, नवीन उल हक २/४) पराभूत वि. अफगाणिस्तान १५.१ पटकांत तीन बाद १०१ धावा (गुल्बदीन नेब नाबाद ४९, मोहम्मद नबी नाबाद १६, सीमो कामिया १/१६).
सर्वाधिक चेंडू राखून अफगाणचे विजय

७३ वि. आयर्लंड, २०१७

५९ वि. श्रीलंका, २०२२

३२ वि. झिम्बाब्वे, २०१८

२९ वि. पीएनजी, २०२४

१६ वि. अमिराती, २०१५

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply