Aditya Thackeray : 'मुंबईची लूट, कोस्टल रोड पूर्ण न करता श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाचा घाट...' आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या कामावरुन पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला आहे. कोस्टल रोड तयार नाही, पण श्रेय घेण्यासाठी सरकार उद्घाटन करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"कोस्टल रोडच काम आमचं आहे. उध्दव ठाकरे  यांचं ते स्वप्न होतं. दर महिन्याला आम्ही भेटी द्यायचो. आत्ता त्याचा मुंबईशी काही संबंध नाही. त्याच उद्घाटन आत्ता होणार आहे. MTHL च उद्घाटन यांनी लांबवलं. दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन यांनी लांबवलं. तसेच कोस्टल रोडच काम पूर्ण देखील झालं नाही, तरी केवळ निवडणुकांना घेऊन उद्घाटनाचा घाट घातला जातोय," असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

Maharashtra Politics : भाजप आमदाराच्या गोळीबारानंतर ठाकरे गटाचे CM शिंदेवर गंभीर आरोप; ईडी-सीबीआय चौकशीची मागणी

"महालक्ष्मी रेसकोर्सवर घोड्यांसाठी तबेला बांधून दिला जाणार आहे. बीएमसी यासाठी १०० कोटींचा खर्च करणार आहे. घोडे हे सुटा बुटतील लोकांचे आहेत. त्यांना तबेले बांधून देणार आहे. मग जनतेचा पैसा का वापरला जातोय? असा सवाल उपस्थित करत यासाठी आमचा विरोध असेल," असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

"मुंबई लुटली तशी यांना आत्ता राज्य लुटायचे आहे. दिल्लीला गेले तर दिल्ली लुटली. आम्ही प्रश्न घेतल्यानंतर आत्ता क्लब हाऊस यांनी कॅन्सल केले. आम्ही बिल्डरांना तिथे कार पार्क करू देणार नाही. घटनाबाह्य सरकार लवकरच कोसळणार आहे, आम्ही मुंबईकरांचा पैसा वाया जाऊ देणार नाही.." अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply