ACP Transfer Pune news : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिस दलातील सहा ‘एसीपीं’च्या बदल्या

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलातील सहा सहायक पोलिस आयुक्तांच्या (एसीपी) बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी बदल्यांचे आदेश मंगळवारी (ता. १६) काढले आहेत.

सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि पोलिस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित सहायक पोलिस आयुक्तांची नावे आणि कंसात सध्याचे आणि बदलीचे ठिकाण - नंदा पाराजे (मंदिनी वग्यानी) - (प्रशासन ते स्वारगेट विभाग), रुक्मिणी गलंडे - (अभियान ते फरासखाना विभाग), अजय चांदखेडे - (नव्याने हजर- प्रशासन), मच्छिंद्र खाडे - (वाहतूक शाखा-प्रशासन ते वाहतूक शाखा परिमंडळ-१), नारायण शिरगांवकर - ( स्वारगेट विभाग ते वाहतूक शाखा-प्रशासन), अशोक धुमाळ - (फरासखाना विभाग ते अभियान).

दरम्यान, आस्थापना विभागातील सहायक आयुक्त रंगनाथ उंडे यांच्याकडे सहायक आयुक्त, अभियान या पदाचा तात्पुरता अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply