Accident News : दोरखंड लावला अन् मोबाईल टॉर्चच्या उजेडात जखमींना वर काढलं, कन्नड घाटातील अपघातात चार भाविक ठार

Accident News :  कन्नड ता.२७( बातमीदार) सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड औट्रम घाटात सोमवारी (ता.२७) पावणे दोन वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करून परतणारी तवेरा कार (क्रमांक एम एच ४१व्ही ४८१६) तीनशे फूट खोल दरीत कोसळली.या अपघातात चार जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू व जखमी जानेवाडी , मालेगाव येथील रहिवासी आहेत.

बचाव पथकात राष्ट्रीय महामार्ग पोलिस, चाळीसगाव शहर, ग्रामीण पोलीस या तीन पथकांनी व स्थानिक प्रवाशांनी रात्री सव्वादोन वाजता मदतकार्यास सुरवात केली.सकाळी सात वाजेपर्यंत मदत कार्य चालले. त्यातच घाटातील मेणबत्ती पॉईंटवर दरड कोसळली. मोठाले दगड,माती रस्त्यावर पडून रस्ता बंद झाला.त्यामुळे जखमींना रुग्णालयापर्यंत पोहचविण्यात अडथळे निर्माण झाले. हे दगड,माती हटविण्यासाठी या पथकाने शर्थ केली. अक्षरशः हातांनी व फावड्याने दगड माती हटविण्यात आले.पाऊस,धुके आणि अंधार यामुळे मदत कार्य जिकरीचे व आव्हानात्मक झाले.

MNS On Marathi Patya : मुंबईत मराठी पाट्यांचा प्रश्न पेटला, आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

तिनशे फुट खोल दरीतून चार मृत्यू देह व सात जखमींना दोरखंड लावून, मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात वर काढण्यात आले.

अक्कलकोट येथून देवदर्शन करून तवेरा कारने मालेगाव येथे परतत असताना पाऊस,धुके असल्याने कारचाकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने व तुटलेल्या कठड्यामुळे कार दरीत कोसळली. घाटातील जय मल्हार पॉंईंट,जुना लाकडी पुल येथे अपघात झाला.

मृतांमध्ये प्रकाश गुलाबराव शिर्के (वय 65) शिलाबाई प्रकाश शिर्के (वय ६०) वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी (वय ३५) ,पूर्वा गणेश देशमुख (वय-८ )यांचा समावेश आहे. जखमींमध्ये अनुज धर्मेंद्र सूर्यवंशी (वय-२०) जयेश धर्मेंद्र सूर्यवंशी (वय 17 ) सिद्धेश पुरुषोत्तम पवार (वय -१२) कृष्णा वासुदेव शिर्के (वय -४), रूपाली गणेश देशमुख (वय- 30 )पुष्पा पुरुषोत्तम पवार( वय -35) व वाहन चालक अभय पोपटराव जैन (वय ५०)पन्नास यांचा समावेश आहे.

अपघात झाल्यानंतर जखमी अनुष धर्मेंद्र सूर्यवंशी हा तिनशे फूट दरीतून वर आला व त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मदतीसाठी याचना केली. काही प्रवाशांनी चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलिसांचे संपर्क साधला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग पोलीस पथक चाळीसगाव ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

ग्रामीण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील ,वीरेंद्र शिसोदे ,गणेश काळे, जितेंद्र माळी, ललित महाजन, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरवडे, संदीप पाटील ,नाना बडगुजर, युवराज नाईक, संदीप माने, मनोज पाटील, बाबा राजपूत,नितीन वाल्हे, वीरेंद्र राजपूत, राजेंद्र साळुंखे, शंकर जंजाळे, नंदू परदेशी, राहुल सोनवणे आदींसह राष्ट्रीय महामार्ग पोलिस,चाळीसगाव शहर ग्रामीण पोलीस ठाण्याचे मदत पथक तसेच स्थानिक प्रवाशांनी अपघातग्रस्तांना खोल दरीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली.

जखमींना चाळीसगाव येथे अॕम्बुलन्स द्वारे रुग्णालयात पोहचविण्यात आले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply