Accident News : भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, बहीण-भावाचा जागीच मृत्यू

Dharashiva : धाराशिवमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. उमरगा शहरातील बाह्यवळण रस्त्याच्या कॉर्नरजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणारे बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या उमरगा शहराजवळील बाह्यवळण रस्त्याच्या कॉर्नरजवळ टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. दोघेही गावाकडे निघाले होते. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

धारिशिव तालुक्यातील कोळसूर (गुंजोटी) येथील रहिवाशी शिवाप्पा सातप्पा मगे हे आपली बहिण अनिता देवेंद्र माळी यांना मुंबई येथे पाठविण्यासाठी बसस्थानकात आले होते. बस नसल्याने दोघेही परत कोळसुर गावाकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. याचवेळी उमरगा शहराच्या बाह्य वळण रस्त्याकडे जात असताना हैद्राबादकडे निघालेल्या टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. टेम्पोने दोघांनीही फरफटत नेले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *