Accident News : नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात; २० हून अधिक प्रवासी जखमी

Accident News : नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. भरधाव कंटेनर आणि दोन ट्रॅव्हल्स एकमेकांना धडकल्या. अपघात इतका भीषण होता, की तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेत जवळपास २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जखमीपैंकी ४ ते ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लावल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Bacchu Kadu : माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट, आमदार बच्चू कडू यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र; अमरावतीत खळबळ

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे कंटेनर येत होता. त्याचवेळी पुणे येथून प्रवाशांना घेऊन दोन खासगी ट्रॅव्हल्स अमरावतीच्या नागपूरच्या दिशेने येत होत्या. कारंजा तालुक्यातील पेडगाव येथे पहाटेच्या सुमारास तिन्ही वाहने एकमेकांना धडकली.

अपघात इतका भीषण होता, की तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत ट्रॅव्हल्समधील २० प्रवासी जखमी झाले. यातील ४-५ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply