Accident : देव दर्शनावरून येताना काळाचा घाला, अंकलेश्वरमध्ये विचित्र अपघात, कारचा चक्काचूर, पालघरमधील ३ जणांचा मृत्यू

Gujarat Road Accident : राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्गा येथे दर्शनासाठी गेलेल्या पालघर मधील भाविकांचा गुजरातमधील अंकलेश्वर येथे भीषण अपघात झालाय. पहाटे साडेतीन वाजता काळाने घाला घातला. भरधाव कारने टँकरला जोरदार धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात घाताल. पालघरच्या मनोर येथील आयान बाबा चौगले , ताहीर नासिर शेख आणि टाकवहाल येथील मुद्दत्सर अन्सार पटेल यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भरूच येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की भरधाव कारचा चक्काचूर झालाय.

 

राजस्थान राज्यातील अजमेर शरीफ दर्गा वरून परतीच्या प्रवासा दरम्यान गुजरात राज्यातील भरूच अंकलेश्वर भागात बुधवारी (ता.08)पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात पालघर तालुक्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयान बाबा चोगले (रा. मनोर) ताहीर नासिर शेख (रा. पालघर) आणि मुदस्सर अन्सार पटेल (रा. टाकवहाल) यांचा मृत्यू झाला. तर सलमान अल्ताफ शेख, शाहरुख सलीम शेख, शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख सर्व (रा. काटाळे) गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर गुजरातमधील भरूच परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Buldhana Crime : बुलडाणा हादरले! वसतीगृह अधीक्षकाचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, आईला सांगितल्याने जबर मारहाण

 

गुजरातमधील अंकलेश्वर येथे पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने कारला धढक दिली. त्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले अन् समोर असणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली अन् भीषण अपघात झाला होता. अपघातग्रस्त आर्टीगा कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती कळताच मनोर, टाकवाहाल, काटेला आणि पालघर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पालघरमधील सात जण अजमेर येथील उर्स उत्सवात सहभागी होऊन परतत होते. सुरतच्या दिशेने येत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अंकलेश्वर पानोलीजवळील पुलावर मागून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. धडकेमुळे कार पुढे हळू चालणाऱ्या दुसऱ्या ट्रकला धडकली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघतात जखमी झालेल्या चार जणांवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलीस अधिकारी शिल्पा देसाई यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply