ABVP Protest at SPPU : पुणे विद्यापीठात गोंधळ घातल्याप्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत परवानगी नसताना ‘रॅप’ गाण्याच्या झालेल्या चित्रीकरणाबाबत सखोल चौकशी करावी यासाठी तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केले. या दरम्यान विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तोडफोड करण्यात आली.

दरम्यान, विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. विद्यापीठाच्या इमारतीत तोडफोड झाल्याने पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. दुपारी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या दालनात तोडफोड झाल्याची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत व्हायरल झाली. परंतु ही तोडफोड अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनादरम्यान कोणत्याही कार्यकर्त्याकडून झालेली नाही. आम्ही विद्यापीठात संविधानिक पद्धतीने आंदोलन केले आहे. विद्यापीठ प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन विद्यापीठाने दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी सांगितलं.

या मागण्यांसाठी आंदोलन

  • विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत परवानगी नसताना ‘रॅप’ गाण्याच्या झालेल्या चित्रीकरणाप्रकरणी कडक कारवाई करावी

  • शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे

  • परीक्षांचे प्रलंबित निकाल लावावेत तसेच लागलेल्या निकालांमधील चुका दुरुस्त कराव्यात

  • क्रीडा संकुल विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी खुले करावे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply