Abu Asim Azmi : अबु आझमींना जीवे मारण्याची धमकी, औरंगजेबला पाठिंबा दिल्यानं फोनवरून शिवीगाळ

Abu Asim Azmi Threats : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबु असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आझमींच्या स्वीय सहायकाला हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

अबु असीम आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत. औरंगजेबाला पाठिंबा दिल्याबद्दल आझमींना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणारा फोन त्यांच्या स्वीय सहायकाला आला होता.

आझमींच्या पीएला फोन करून अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या प्रकरणात मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलाबा पोलिसांनीअज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ५०६ (२) आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अबु आझमींना याआधीही जीवे मारण्याची धमकी आली होती. जुलै २०२२ मध्ये आझमींच्या स्वीय सहायकानेच पोलिसांत तक्रार नोंदवली होती. आझमींच्या पक्षाने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध केला होता, त्यामुळे त्यांना फोनवरून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply