Abdul Sattar : शेतकऱ्यांना दिलासा! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची विधानपरिषदेत मोठी घोषणा

Abdul Sattar : राज्यात मागील काही दिवसांपुर्वी विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसानं झालं आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं.

यापार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानावर पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देणार असल्याची माहिती दिली. नुकसान झालेला एकही शेतकरी पीकविम्या पासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व जिल्हाधिका-यांना आदेश दिलेत असे देखील सत्तार यांनी सांगितले.

दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2305 कोटी रूपये नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी केले आहे, असंही यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

नंदुरबार जिल्ह्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान केले होते. काढण्यासाठी आलेला गहू, ज्वारी, हरभरा, मिरची, पपई, केळी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राज्यात पावसासोबत आता गारपिटीचे संकट

राज्यात पुन्हा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम पावसाशी, संबंधित सोसाट्याचा वारा येण्यासाठी आयमडीद्वारे अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे. खालील चेतावणी 15-18 मार्च पर्यंत आहेत. आज महाराष्ट्रासाठीही TS इशारा देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply