IND vs USA, Live Streaming : टीम इंडियासमोर अमेरिकेचं आव्हान! कुठे अन् किती वाजता रंगणार सामना?

.

IND vs USA, Live Streaming :आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आज आणखी एक मोठा सामना पाहायला मिळणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी २-२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज जिंकणाऱ्या संघाला सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. दरम्यान हा सामना कुठे पाहता येईल? जाणून घ्या

भारत विरुद्ध अमेरिका सामना किती वाजता सुरू होणार आहे?

भारत विरुद्ध अमेरिका हा सामना १२ जून रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल.

भारत विरुद्ध अमेरिका सामना कुठे रंगणार आहे?

हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

भारत विरुद्ध अमेरिका सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?

हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा डिस्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

IND Vs USA : शिवम दुबे OUT, 'या' खेळाडूला मिळणार संधी... अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित करणार मोठा बदल?

असे आहेत दोन्ही संघ :

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल.

अमेरिकेचा संघ:

स्टीवन टेलर, मोणांक पटेल (कर्णधार, यष्टिरक्षक), अँड्रीस गौस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉस्टुश केंजीगे, सौरभ नेत्रवलकर, अली खान, निसर्ग पटेल, शायन जहांगीर, मिलिंद कुमार, शेडली वॅन शल्कविक.

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply