टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा होणार IND vs PAK सामना? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs PAK scenario T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी खुपच खराब राहिली आहे. त्याने आपल्या प्रवासाची सुरुवात यूएसए विरुद्ध खेळून केली, ज्यामध्ये बाबर आझमच्या संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी, रविवारी बाबर आझमच्या संघाला स्पर्धेतील 19व्या सामन्यात भारताकडून 6 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पाकिस्तानवर आता स्पर्धेतून बाहेर होण्याचा धोका आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या, ज्याचा क्रिकेटप्रेमींनी चांगलाच आनंद लुटला. मात्र, या दोन संघांमधील आणखी एक सामना या स्पर्धेत होऊ शकतो. जवळपास हे शक्य आहे पण त्यासाठी काही गोष्टी पाकिस्तानच्या बाजूने जाणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे यावेळी या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रथिक गटात 5-5 संघ आहेत. ग्रुप स्टेज संपल्यानंतर केवळ 8 संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. याचा अर्थ प्रत्येक गटातून दोनच संघ पुढच्या टप्प्यात प्रवेश करतील, उर्वरित तीन संघांचा प्रवास संपेल.

SA Vs BAN Highlights : दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर ४ धावांनी विजय; केशव महाराजने शेवटच्या षटकात फिरवला सामना

दुसरी फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला आगामी दोन सामन्यामध्ये कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध मोठे विजय मिळवावे लागतील जेणेकरून त्यांचा नेट रन रेट चांगला होईल. त्याचबरोबर टीम इडिया आणि आयर्लंड यांनाही आपापल्या सामन्यात यूएसएचा पराभव केला पाहिजे. यानंतर जर पाकिस्तानचा नेट रन रेट अमेरिकेपेक्षा चांगला असेल तर त्यांना सुपर-8 मध्ये प्रवेश मिळेल.
सुपर 8 मध्ये 8 संघ दोन गटात विभागले जाणार आहेत.

• पहिल्या गटात - A1, B2, C1 आणि D2

Dreaming Time to sta

• दुसन्या गटात - A2, B1, C2 आणि D1

अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना उपांत्य फेरीतच शक्य आहे. ज्यासाठी सुपर 8 मध्ये जाण्याआधी भारतीय संघाला आपल्या गटातील पहिल्या स्थानावर टप्पा पूर्ण केला लागेल आणि पाकिस्तानला दुसरे स्थान मिळवावे लागले.

म्हणजे भारत सुपर 8 मध्ये पहिल्या गटात जाईल तर पाकिस्तान दुसऱ्या गटात. आता सुपर 8 मध्ये रोहित शर्माच्या संघाने पहिल्या गटात दुसरे स्थान मिळवले आणि बाबर आझमच्या संघाला दुसऱ्या गटात अव्वल स्थान मिळवावे लागेल. तरच उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply