IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Hardik Pandya Statment on MI vs LSG IPL 2024 : आयपीएल 2024 हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वाईट हंगाम होता. संघाने शेवटच्या स्थानावर म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आपला हंगाम संपवला. या हंगामात मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार बनवले होते. जिथे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाला खूप टीकेला सा

मुंबई इंडियन्सने त्यांचा शेवटचा आयपीएल सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला. या सामन्यात लखनौ संघाने त्यांचा 18 धावांनी पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा पराभव हा त्यांचा या हंगामातील दहावा पराभव आहे. याआधी 2022 मध्ये त्यांना एकाच मोसमात 10 पराभवांना सामोरे जावे लागले होते. खराब हंगामातील शेवटच्या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्या खूपच निराश दिसला आणि त्याने सामना संपल्यानंतर मोठे वक्तव्य केले.

Mumbai Indians : रोहित शर्माला स्वत:ला वाटतं नसेल की रिटेन व्हावं, मनोज तिवारीनं सांगितली मन की बात

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या म्हणाला की, हा हंगामा खूप कठीण गेला. एक संघ म्हणून आम्ही दर्जेदार क्रिकेट किंवा स्मार्ट क्रिकेट खेळू शकलो नाही, ज्यामुळे संघाला संपूर्ण हंगामाचा फटका बसला. हे व्यावसायिक जग आहे. आम्ही कुठे चुकलो हे सांगणे कठीण आहे. कारण संपूर्ण हंगाम आमच्याकडून चुका झाल्या.

कसा झाला सामना?

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊ संघाने 18 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने 20 षटकांचा खेळ संपल्यानंतर 6 गडी गमावून 214 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाला 20 षटकांत 196 धावांपर्यंत मजल मारता आली.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply