
Border 2 Movie Updates Sunny Deol : 1997 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट बॉर्डरने (Border) बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धातील एका सत्य घटनेवर आधारीत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. सनी देओल, सुनिल शेट्टी, अक्षय खन्ना यांच्यासह अनेक कलाकारांच्या यात भूमिका होत्या. मागील काही दिवसांपासून बॉर्डर-2 बद्दल चर्चा सुरू होती. आता, या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. बॉर्डर-2 चित्रपटात सन्नी देओलची भूमिका असणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आयुष्यमान खुरानादेखील असणार आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार याची माहितीदेखील समोर आली आहे.
कधी रिलीज होणार बॉर्डर-2
'बॉर्डर-2' ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भूषण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता हे 'बॉर्डर 2' चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट अनुराग सिंह दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे. आयुष्मान खुराना आणि सनी देओल हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
|
|
'बॉर्डर 2'साठी 'गदर-2' फॉर्म्युला?
'पिंकविला'ने दिलेल्या वृत्तानुसार, सनी देओल पुन्हा मेजर कुलदीप सिंग चंदुरीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आयुष्मान भारतीय सशस्त्र दलातील अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजसाठी निर्मात्यांनी प्रजासत्ताक दिनाची निवड केली आहे. 'बॉर्डर 2'साठी देखील 'गदर 2'चा फॉर्म्युला निर्माते वापरत असल्याची चर्चा आहे. 'गदर 2' हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. 'बॉर्डर-2' हा चित्रपटही प्रजासत्ताक दिनाच्या खास दिवशी प्रदर्शित करून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याचा विचार निर्मात्यांचा असावा.
बॉलिवूडमधील आतापर्यंतचा मोठा युद्धपट!
'बॉर्डर 2' सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा युद्धपट ठरणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या वृत्तानुसार 'बॉर्डर 2' च्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. एक स्क्रिप्टही तयार करण्यात आली असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसात स्क्रिप्टवर निर्णय घेतला जाईल.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

