Ajit Pawar on Baramati Loksabha : चुरशीच्या लढतीत बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घसरला; अजित पवार काय म्हणाले?

Ajit Pawar on Baramati Loksabha : अवघ्या राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष लागून बारामतीसाठी लोकसभेला सर्वात कमी मतदान झाल्याने नेमका कोणाला तोटा होणार आणि कोणाला फायदा होणार? याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीमध्ये लढत होत आहे. मात्र, अपेक्षित मतदान न होता थेट 2019 च्या तुलनेत टक्का घसरल्याने दोन्ही गटातही अस्वस्थता आहे. पैशांचा वापर झाल्याचाही आरोप होत आहे. अजित पवार यांनी बारामतीमध्ये घटलेल्या मताधिक्यावर भाष्य केलं आहे. 

काय कौल दिला आहे हे निकालानंतर कळेल

अजित पवार यांनी सांगितले की, लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का कमी झाला, पण बारामतीत थोडं वाढलं आहे.  इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे मतदान झालेलं नाही. बारामतीमध्ये कसंबसं 60 टक्के मतदान झालं आहे. मतदारांनी मतदान करुन काय कौल दिला आहे हे निकालानंतर कळेल. मतदान कमी झाल्याने चिंता नाही. मागच्या वेळीपेक्षा बारामतीची तुलना करता मतदानाचा टक्का वाढला आहे. कालपासून शिरुर मावळ पुणे लोकसभा मतदारसंघात कामाला सुरुवात केल्याचे ते म्हणाले. 

Mumbai News : मुंबई म्हाडा मंडळाकडे घराच्या योजनेसाठी एक लाख ११ हजार गिरणी कामगारांची कागदपत्रे जमा, ९६ हजार कामगार पात्र

बारामतीच्या निवडणूक आयोगाकडे तक्रारींवरही अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, दोघांनीही एकमेकांवर तक्रारी केल्या आहेत. अशा तक्रारी होत असतात, त्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. पीडीसीसी बँक उघडी असेल, तर चौकशी करावी, सीसीटीव्ही पाहून कारवाई करा, असे अजित पवार म्हणाले. 

आव्हान देणाऱ्याला महत्व देत नाही

अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आव्हानावर म्हणाले की, अमोल कोल्हे आव्हान देत असतील, तर त्यांचे काम करतात, पण मी कामाचा माणूस आहे. आव्हान देणाऱ्याला महत्व देत नाही. जो मला आव्हान देतो त्याला खासदारकीचे तिकिट मीच देऊन निवडूनही आणलं होतं. दिवस बदलत असतात, त्यांना करायचे ते करु द्या, आम्ही जनतेला सांगू. ते पुढे म्हणाले की, अमोल कोल्हे यांनी जनसंपर्क ठेवला नाही. राजीनामा देणार होते, पण असा काय चमत्कार घडला? अभिनय क्षेत्रातील असल्याने खासदार म्हणून काम करणं अशक्य असल्याची भूमिका कोल्हेंची होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होईल का?

अजित पवार यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याचे विधान शरद पवारांनी केलं. मात्र हे त्याचे वैयक्तिक असेल. त्यांच्या पक्षाबद्दल त्यांनी काय विचार करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. निवडणूक सुरु झाल्यापासून देश आणि राज्य पातळीवरील पक्ष आहे. साऊथमध्ये राज्य पातळीवरील पक्ष जास्त ताकदवान असल्याचे ते म्हणाले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply