Supriya Sule : 'मी नात्याचा आणि पदाचा सन्मान केला, पण...', सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

Supriya Sule : ' बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज प्रचाराला नारळ फोडला. बारामतमधील कन्हेरी मारुती मंदिरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यानंतर बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'मी नात्याचा सन्मान केला, पदाचा सन्मान केला, पण आता हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा.', असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली.

सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील सभेदरम्यान अजित पवार यांचे नाव न घेता खंत व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, 'मला काही जण म्हणले होते मी बारामतीमध्ये कमी येते. पण असं ठरलं होतं की मी दिल्लीत असणार आणि बाकीची कामं इथले लोकं करणार. मी नात्याचा सन्मान केला, पदाचा सन्मान केला, पण आता हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. झालं गेलं गंगेला वाहिलं. पण आता बदल करावा लागेल. आपली वैचारिक लढाई आहे वैयक्तिक नाही. '

Pune News : पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात

सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले की, 'माझं काम आणि मेरिट बघून मला संधी द्या. बारामतीची निवडणूक अमेरिकापर्यंत पोहचली आहे. न्यूयॉर्क टाईमचे पत्रकार २ दिवसांपासून बारामतीमध्ये आले आहेत. मी एक पुस्तक विरोधकांना पाठवणार आहे. ज्यात मी काय काय काम केलं हे दाखवणार आहे. उद्या जे जे कन्हेरीमध्ये येतील ते मलाच मतदान करतील.'

तसंच, सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी सांगितले की, 'एकीकडे संसदरत्न देतात आणि दुसरीकडे मला निलंबित करतात. मला फाशी दिली तरी चालेल पण मी कांद्याला भाव मागत राहणार. आपआपल्यात भांडण लावून ते दिल्लीत बसून मजा बघतात. दिल्लीवाल्यांना नडतो कोण तर मी आणि अमोल कोल्हे. फार भानगड नाही करायची आपण आपली तुतारी वाजवायची आपलं एकच लक्ष राम कृष्ण हरी. सेवा, सन्मान, स्वाभिमान या ३ गोष्टी धरून मी राजकारण करते.' असं त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply