Maharashtra Lok Sabha : 'मी लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार', प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर वसंत मोरेंचं वक्तव्य

Maharashtra Lok Sabha : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही दिसांपासून विविध पक्षांच्या प्रमुखांच्या ते गाठीभेटी घेत आहेत. दरम्यान आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार करत रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे पुण्यातून वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार यावर अनेक चर्चा सुरू आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. आपण लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचंही त्यांना सांगितलं होतं. मात्र महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर वंसत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. येत्या २ एप्रिलला यावर अतिंम निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

Parbhani News : फटका सायलेन्सर्सचा राेलरखाली चुराडा, फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईचा बडगा

वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आजच्या भेटीमुळे वंचितकडून वसंत मोरे पुण्यातून निवडणूक लढवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांची काल भेट झाली होती. त्यानंतर पुण्यातील मराठा समाजाच्या बैठकीला वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आता वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीमुळे वसंत मोरे वंचितचे पुण्यातून उमेदवार असण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply