
Political News : माजी खासदार तथा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून झालेल्या 'तू तू मैं मैं' नंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आढावा घेतला आहे. या आढावा बैठकीत संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना न बोलवता उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतली आहे. तर, लोकसभा उमेदवारीवरून दानवे आणि खैरे यांच्यात सुरु असलेल्या 'तू तू मैं मैं' ची बातमी सर्वात आधी 'एबीपी माझा'ने दाखवली होती.
अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघेही आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यावरूनच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना चिमटे काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमधील 'तू तू मैं मैं' ची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मंगळवारी मातोश्रीवर छत्रपती संभाजीनगरमधील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत आलेल्या पदाधिकाऱ्यांना लोकसभेचा उमेदवार कोण हवा? खैरे की दानवे? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक विचारणा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल चंद्रकांत खैरे यांच्या नावावर असल्याची सूत्रांची माहितीआहे.
|
|
अशीही चर्चा झाली?
दरम्यान, याच बैठकीत मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे, संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरण आणि उमेदवार निवडी संदर्भात संभाजीनगरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आहे. त्यामुळे खैरे आणि दानवेंच्या लोकसभा उमेदवारीच्या दाव्यानंतर उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
कोण काय म्हणाले होते?
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतांना अंबादास दानवे म्हणाले होते की, "मी शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे लढण्याची माझी तयारी आहे. कुठेही लढायला सांगितलं तरी, केवळ निवडणूक नाही, इतर कोणतीही लढाई लढायला सांगितली तरी ती लढाई लढण्याची माझी 100 टक्के तयारी आहे. तसेच, मी मागच्या 10 वर्षांपासून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे." असे अंबादास दानवे म्हणाले आहे.
खैरेंची दानवेंवर टीका...
"अंबादास दानवेंना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यामुळे गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला आहे.छत्रपती संभाजीनगर ची निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील ते लढवणार. होईन ना चांगलं. कशाला काळजी करायची. जनतेची जी इच्छा आहे, ती उद्धव ठाकरे मान्य करतील." असे खैरे म्हणाले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

