Parbhani Accident : परभणीत भीषण अपघात! ट्रॅक्टर आणि क्रुझरची समोरासमोर धडक; ३ जणांचा मृत्यू, ५ जखमी

Parbhani Accident : परभणीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी पाटीवर उसाने भरलेला ट्रक आणि देवदर्शनाहून परतणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परतूर तालुक्यातील ब्राह्मण वाडीमधील ९ जण परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील मारुती दर्शनाला गेले होते. यावेळी दर्शन करुन घराकडे येताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ त्यांच्या क्रूझरचा आणि उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली.

Pune Crime : पाय धुतलेले पाणी प्या, परीक्षेत यश मिळवा... महिलेने तरुणाला घातला दीड लाखांचा गंडा; 'अंनिस'कडून भांडाफोड

ही धडक इतकी भयंकर होती की, यामध्ये तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात मदत केली.

या दुर्दैवी अपघातात अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके, अमोल मार्तंड सोळंके आणि दिगंबर भिकाजी कदम या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर उमेश सोळंके, संतोष सोळंके, कुंडलिक सुतार, किशोर सोळंके हे पाच जण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील भोरजवळ भीषण अपघात..

दरम्यान, पुण्यातील भोर तालुक्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांच्या चिमुकल्यासह एकजण जखमी आहे. चीव्हेवाडीजवळील देवडी येथे हा भीषण अपघात झाला. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply