Dhangar Reservation : धुळे -सोलापूर महामार्गांवर धनगर समाजाकडून रस्ता रोको; आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी

Dhangar Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झाला आहे. याच मागणीसाठी  जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.  यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

जालन्यात धनगर समाजाचे आंदोलन आता तीव्र झाले आहे. एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरु असून काळ जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला होता. यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर आज जालन्यातील जामखेड फाटा परिसरात धनगर समाजाच्या कार्यकर्त्याकडून टायर जाळून रस्ता रोको आंदोलनास सुरवात केलीय. 

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी फडणवीसांनी सांगितला भाजपचा मास्टर प्लॅन

महामार्गावरील वाहतूक ठप्प 

यावेळी कार्यकर्त्यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत काल जालन्यात पोलिसांनी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हे सरकारने चुकीच्या पद्धतीने दाखल केले असल्याचा आरोप करत या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे बीड -छत्रपती संभाजीनगर महामार्गांवरील जामखेड फाटा परिसरात गेल्या अर्ध्या तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply