Govt Officer Shailaja Darade Arrested : राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अटक, भावावरही गुन्हा दाखल

Pune  : राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आलं होत. शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिष दाखवत उमेदवारांकडून पैसे घेत नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता.

शैलजा दराडे यांच्याविरोधात पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता शैलजा दराडे यांना अटक केली. शैलजा यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन 44 उमेदवारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

Pune Water Supply : पुणेकरांना दिलासा!गुरूवारी शहराला नियमित पाणीपुरवठा होणार, पाणी बंदचा निर्णय मागे

राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली होती. फसवणुकीचे हे प्रकार 15 जून 2019 पासून सुरु होते. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply