Kolhapur Rain Updates: कोल्हापूरला आज ऑरेन्ज अलर्ट, पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Panchganga River Towards Alert Level: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद होत असून पुन्हा एकदा पंचगंगा नदीची पातळी वाढू लागली आहे. अशातच हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेन्ज अलर्ट दिलेला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 36 फुटांवरून वाहत आहे. 

पंचगंगा नदीची संथ गतीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पंचगंगेची पाणीपातळी सध्या 36 फूट असून इशारा पातळी 39 फूट आहे. त्यामुळे इशारा पातळीच्या जवळ नदीचे पाणी पोहोचले आहे. पंचगंगेची धोका पातळी 43 फूट एवढी आहे. 

Khadakwasala Dam : खडकवासला धरण साखळीत २४ तासात वाढले एक टीएमसी पाणी

कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली आले आहेत. जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अशी परिस्थिती असताना कोल्हापूर जिल्ह्याला आज हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट दिला आहे. सध्या जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply