Lokmanya Tilak Award : PM मोदींना टिळक पुरस्कार जाहीर झाल्यानं वाद! काँग्रेसकडून आक्षेप

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. हा पुरस्कार मोदींना देण्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. याबाबत काँग्रेसच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. 

काय आहे वाद?

टिळक स्मारक संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. पण टिळक स्मारक संस्थेच्यावतीनं हा पुरस्कार ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला ते रोहित टिळक हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना पुरस्कार देण्यावरुन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. या आक्षेबाबतच पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलं आहे.

Maharashtra Political : CM शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार? १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात मोठ्या निर्णयाची शक्यता

कधी दिला जाणार पुरस्कार?

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यातिथीदिनी अर्थात १ ऑगस्ट रोजी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला जातो. यंदा देखील १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार पुण्यात देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. शरद पवारांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply