Bacchu Kadu on NCP : राष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही, बच्चू कडूंनी शिंदे गटाला दिला मोलाचा सल्ला

Amravati : राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सोबत घेताना त्याचं मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होतं. आम्हाला विचारात व विश्वासात न घेता राष्ट्रवादील आणि अजित पवार घेतलं, असा दावा शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी केला.

राष्ट्रवादीला सोबत सरकारमध्ये घेतल्याने आता एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या सर्व आमदारांची गोची झाली आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, कामं होत नव्हती.

शिवसेनेचे मतदारसंघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती, असा आरोप केला जात होता. मात्र त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar : आमच्या पांडुरंगाने आम्हाला आशिर्वाद द्यावा, आक्रमक भाषणादरम्यान अजित पवार झाले भावूक

तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असं होऊ नये याची आम्हाला अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply