
26 /11 Mumbai Attacks : मुंबईतील 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा कुख्यात दहशतवादीअब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू झाला आहे. तो पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होता. लष्कर-ए-तोएबा (Lashkar-e-Taiba) दहशतवादी संघटनेचा दहशतवादी आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. अब्दुल सलाम भुट्टावी 78 वर्षांचा होता. अब्दुल सलाम भुट्टावी 2020 पासून टेरर फंडीग प्रकरणी म्हणजेच दहशवतवादाला आर्थिक खतपाणी घालण्यासाठी शिक्षा भोगत पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होता.
संयुक्त राष्ट्र संघाने 2012 मध्ये, अब्दुल सलाम भुट्टावीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं. त्यानंतर त्याला दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. य प्रकरणात लष्कर-ए-तोएबाचा संस्थापक हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की याच्यासह अब्दुल सलाम भुट्टावीला न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. ऑगस्ट 2020 मध्ये अब्दुल सलाम भुट्टावीला 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून तो पाकिस्तानच्या तुरुंगात होता.
हाफिज सईदचा उजवा हात भुट्टावी
2008 साली मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) अटकेनंतर अब्दुल सलाम भुट्टावीनं 2002 आणि 2008 मध्ये लष्कर-ए-तोएबाचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं. लष्करशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुट्टावीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. भुट्टावीचं सोमवारी दुपारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
मुंबई हल्ल्यात भुट्टावीची महत्त्वाची भूमिका
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यामध्ये अब्दुल भुट्टीवीचाही हात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. 2008 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना भुट्टीवीनं प्रशिक्षण दिलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, हाफिज सईदच्या अटकेनंतर अब्दुल सलाम भुट्टावी लष्कर-ए-तोएबाचा म्होरक्या होता. 2011 मध्ये भुट्टावीनं स्वत: दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबासाठी 20 वर्षे काम केल्याची कबुली दिली होती. नोव्हेंबर 2008 मध्ये लष्कर-ए-तोएबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी हल्ले केले होते. यामध्ये अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांतील एकूण 166 लोकांचा मृत्यू झाला होता.
भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांकडून भुट्टावीच्या मृत्यूला दुजोरा
लष्कर-ए-तोएबाशी संबंधिता संघटनांनी भुट्टावीच्या अंत्यसंस्काराचा व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे. मंगळवारी सकाळी लाहोरजवळील मुरीदके येथील लष्कराच्या मरकजमध्ये भुट्टीवीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनीही अब्दुल सलाम भुट्टावीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

