26/11 Attack : भारताला मोठं यश! 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यास अमेरिकी कोर्टाची मंजुरी

26/11 Attack : २६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकन न्यायालयाने मंजुरी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यता दिली.

लॉस एंजलिस जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती जॅकलिन चूलजियान यांनी १६ मे रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, राणावर असलेल्या आरोपांकडे पाहता तो प्रत्यार्पित करण्यास पात्र आहे.

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ राेजी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात एकूण १६६ जणांचा बळी गेला होता. या हल्ल्यातील राणा सहभागी आहे, त्याला प्रत्यार्पित करण्याच्या मागणीनंतर अमेरिकेत राणाला अटक झाली होती.

काेर्टातील सुनावणीदरम्यान अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी दावा केला की, त्याचा बालपणीचा मित्र आणि पाकिस्तानी-अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडली तोयबाशी लागेबांधे होते. राणाने हेडलीला मदत केली, त्याच्या कारवायांसाठी साथ दिली होती. राणाला हेडलीच्या बैठका, काही टार्गेटसह हल्ल्याच्या नियोजनाचीही माहिती होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply