पुणे शहरातील १० वर्ष जुन्या उड्डाणपूलांचे होणार तपासणी

पुणे - हडपसर येथील उड्डाणपुलाच्या पिलरला तडा गेल्याने व बेअरिंग खराब झाल्याने उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. त्यामुळे गेल्या १० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी १ कोटी ३० लाख रुपयाच्या खर्चास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

पुणे शहरात मुळामुठा नदीवर १७ पूल आहेत. तर विविध भागात १८ उड्डाणपूल आहेत. रेल्वेचे ९ पूल आहेत. यातील काही पूल ब्रिटिशकालीन आहेत. महापालिकेतर्फे दर पाच वर्षांची स्ट्रक्‍चरल ऑडिट करून पूल वाहतुकीसाठी सुरक्षीत आहेत की नाही हे तपासले जाते. हडपसर येथे १५ वर्षापूर्वी उड्डाणपूल बांधण्यात आला. या पुलावरून जाताना हादरे बसत असल्याची तक्रार नागरीकांनी महापालिकेकडे केली. त्यानंतर तज्ज्ञांकडून पुलाची पाहणी केली असता त्यामध्ये पुलाच्या बेअरिंगची झीज व पिलर -१७ ला तडा गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आला होता.

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने उड्डाणपुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव वित्तीय समितीमध्ये मान्य करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने दहा वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या उड्डाणपुलांचे काम केले जाणार आहे. यामध्ये जॉइंट, बेअरिंग यांची तपासणी करणे, पिलरची सुरक्षा तपासणे, कमकुवत झालेले भाग काढून टाकून तेथे नवे भाग वापरणे, पूलावरील डांबराचे वजन कमी करणे अशा प्रकारच्या विविध कामे आवश्‍यक असतात त्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्‍यक आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply