हैद्राबाद : तेलंगणातील निजामाबाद शहरात 19 एप्रिल रोजी रात्री घरात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या (EV) बॅटरीचा स्फोट होऊन एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर या व्यक्तीची पत्नी आणि नातू गंभीररीत्या भाजले आहेत.
पोलिसांनी बॅटरी उत्पादक Pure EV कंपनीविरुद्ध भादंवि कलम 304-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बी. रामास्वामी असे मृताचे नाव असून तो निजामाबादमधील सुभाषनगर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या बॅटरीचा (EV Battery Blast) स्फोट झाला आहे ती रामास्वामी यांचा मुलगा बी प्रकाश याच्या मालकीची आहे.
बी. प्रकाशने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी रात्री त्याने इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी काढून घरातील बेडरुममध्ये चार्जिंगला ठेवली होती. प्रकाश आणि त्यांची पत्नी कृष्णवेणी बेडरूममध्ये झोपले होते, तर त्यांचे आई-वडील रामास्वामी आणि कमलम्मा त्यांचा नातू कल्याणसोबत हॉलमध्ये झोपले होते, जिथे बॅटरी चार्ज होत होती. रात्री 12.30 वाजता प्रकाश यांनी बॅटरी चार्ज करण्यासाठी लावली आणि पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास तिचा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण हॉलला आग लागली. या घटनेत रामास्वामी, कमलम्मा आणि कल्याण भाजले पैकी रामास्वामी यांचा मृत्यू झाला आहे.
निझामाबाद III टाऊन पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साईनाथ यांनी सांगितले की, प्रकाश आणि कृष्णवेणी यांनी आग विझवण्याच्या प्रयत्न केला यावेळी त्यांना किरकोळ दुखापत झाली. तर इतर जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामास्वामी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी हैदराबादला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, प्रकाशने आरोप केला आहे की ईव्ही बॅटरी उत्पादकाने योग्य मानकांचे पालन केले नाही म्हणूनच हा अपघात झाला.
बी. प्रकाश यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि "इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीची निर्मिती करताना मानकांचे पालन केले गेले नाही आणि यामुळे आमच्या कुटुंबाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
दरम्यान, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे खप वाढत असतानाच या वाहनांच्या बॅटरीचे स्फोट होण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यात ओला इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. २६ मार्च रोजी तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाला होता. या घटनेत एक व्यक्ती आणि त्याची मुलगी ठार झाली होती.
शहर
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
महाराष्ट्र
- बुलेट ट्रेनचे तिकीट किती असणार? समोर आली मोठी माहिती, देशभरात ८ कॉरिडॉर झाले निश्चित!
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!



























Subscribe to my channel


