हिसार कोईम्बतूर एसी एक्सप्रेसच्या डब्याला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Hisar Coimbatore AC Express Fire : हिसार कोईम्बतूर एसी एक्सप्रेसच्या एका डब्ब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. निळजे - तळोजा रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली आहे. आगीची खबर मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हिसार कोईम्बतूर एसी एक्सप्रेसच्या मालडब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. निळजे - तळोजा रेल्वे स्टेशन दरम्यान एक्सप्रेसच्या मालडब्याला आग  लागल्याची घटना निदर्शनास आली. त्यानंतर हिसार कोईम्बतूर एसी एक्सप्रेस थांबविण्यात आली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला कळविण्यात आले.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला.त्यांनी आग लागलेल्या बोगी वेगळ्या करण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची वार्ता प्रवाशांमध्ये पसरताच एकच भीती पसरली. आग लागल्यानंतर अनेक प्रवासी एक्सप्रेसमधून बाहेर पडले. त्यामुळेरेल्वे ट्रॅकवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply