हम वोह है जहा मुश्किलें…’, कोर्टाने निर्णय देताच मलिकांचं ट्वीट

सक्तवसुली संचलनालयाने कारवाई केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. नवाब मलिकांच्या घरांवरील छाप्यांनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. दरम्यान मलिक यांच्या वकिलांनी संबंधित कारवाई जाणूनबूजून सुरू असल्याचा आरोप केला. याविरोधात कार्टात धावही घेतली. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत मलिकांना दिलासा देण्यास नकार दिला. यानंतर मलिक यांच्या वतीने ट्वीट करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू आहे. ईडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना दणका दिला आहे. मलिक यांनी ईडीवर आरोप करत संबंधित कारवाई सूडबुद्धीने केल्याचं म्हटलं होतं. ज्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली, त्या वेळी संबंधित कायदाच तयार झालेला नव्हता, असं मलिक यांचे वकील म्हणाले. (Bombay High Court Rejects Habeas Corpus plea of Nawab Malik) संबंधित प्रकरणात मलिकांना चौकशीसाठी बोलावून त्यांच्याकडून माहिती घेता येऊ शकते. मात्र, तरीही मलिकांना कोठडी देण्यात आली, असं वकिलांनी म्हटलं. मात्र, नवाब मलिकांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मलिक पीएमलए कोर्टात जाऊन जामीन मागण्यची शक्यता आहे. न्यायालयाने दणका दिल्यानंतर मलिका यांच्या कार्यालयाच्या वतीने ट्वीट करण्यात आलंय. रुकावटे है ज़रूर पर हौसले ज़िंदा है हम वोह है जहा मुश्किलें शर्मिंदा है


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply