सातारा : मांढरदेवी येथील काळूबाई मंदिरात दीड लाखांची चोरी; रक्कम मोजणाऱ्यानेच दानपेटीवर मारला डल्ला

सातारा : मांढरदेवी येथील काळूबाई मंदिरातील दानपेटीतील रक्कम मोजणाऱ्या निवृत्त बँक कर्मचाऱ्यांने रुपये दीड लाखाची रक्कम आणि सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे मांढरदेवी  येथे आणि काळेश्वरी भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मांढरदेवी  (ता वाई) येथील काळुबाई देवीच्या चरणी भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देत असतात. या मिळालेल्या देणगीची दर महिन्याला खाजगी इसमांकडून मोजणी केली जाते. सोमवारी दुपारी दानपेटीतील रक्कम, चिल्लर आणि दानपेटीत टाकलेल्या दागिन्यांची ट्रस्टी आणि ट्रस्टचे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खाजगी इसम व बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांकडून मोजणी सुरू होती. यावेळी मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याने दोनतीन वेळा आत बाहेर केले. यामुळे संबंधितावर या ठिकाणी असणाऱ्या उपस्थितांचे लक्ष होते. खाजगी नेमणुकीवर असलेल्या निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे ट्रस्टींनी संबंधित कर्मचाऱ्यांची झाडा झडती घेतली. त्यावेळी त्याच्या गाडीत दीड लाखांची रोख रक्कम आणि काही सोन्याचे दागिने आढळून आले. याची माहिती तात्काळ वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना कळविली. त्यांनी सहायक पोलrस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना पाठवून त्याला ताब्यात घेतले.

हा प्रकार किती महिन्यांपासून सुरु होता आत्तापर्यंत किती रकमेचा अपहार झाला आहे. यामध्ये कोणी ट्रस्ट चे कर्मचारी सामील आहेत काय याची चौकशी सुरु आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश असल्याने व ट्रस्टचे प्रशासकीय विश्वस्त म्हणून वरिष्ठ अधिकारी असल्याने माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे.याबाबत ट्रस्टकडे माहिती घेण्याबाबत सांगितले जात आहे. मात्र, ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद आणि संपर्क होत नसल्याने या प्रकारणाबाबत अधिक माहिती मिळण्यात अडचण येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply