सलग ४ दिवस चौकशीला हजर राहा; हायकोर्टाचे किरीट सोमय्यांना आदेश

मुंबई: भाजपा नेते किरीट सोमय्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांचे पुत्र नील सोमय्यांचाही अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने त्यांचा निकाल दिला आहे. किरीट सोमय्यांना सलग ४ दिवस पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याचे हायकोर्टाने आदेश दिले आहेत. आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे किरीट सोमय्यांना अटक होणार का असा प्रश्न उपस्थीत झाला होता. किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी नेत्यांवर आरोप करत आहेत. पत्रकार परिषद घेऊन घोटाळ्यांचे आरोप करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक मोठे आरोप केले होते. किरीट सोमय्यांनी मागच्या काही दिवसांत संजय राऊत आणि ठाकरे परिवारावर खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला होता.

याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांना चौकशीसाठी बोलावले होते. किरीट सोमय्यांवरती अजूनही अटकेची टांगती तलवार कायम आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply