संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेट्स अन् किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान

संदीप देशपांडे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे ठाकरे सेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये,असे त्यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याचबरोबर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकास प्रकल्पाला विरोध सुरू झाला आहे. १०२ आर्किटेक्ट्स आणि मुंबईतील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला असून, यामुळे नैसर्गिक आणि भौगोलिक दृष्ट्या मुंबईवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. समतोल राखण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वीकृत नगरसेवकांसाठी तीन नावे पुढे आल्याचीही चर्चा आहे. मात्र, या भेटींमागील नेमके कारण स्पष्ट नसून, घाईघाईने प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *