संतापजनक! पुण्यात सावत्र बापाकडून ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; नराधमाविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. पुण्यात एका सावत्र बापाने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ११ वर्षीय पीडित मुलीच्या आईचा दुसरा विवाह झाला आहे. या ३२ वर्षीय महिलेली पहिल्या पतीकडून ११ वर्षांची मुलगी असून मुलगी, तिची आई आणि आईचा दुसरा पती असे तिघेही एकत्र राहतात. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, ९ नोव्हेंबरला राहत्या घरात हा धक्कादायक प्रकार घडला.

९ नोव्हेंबरला घरात कुणी नसताना आरोपी बापाने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य करत तिचे लैंगिक शोषण केले. हा प्रकार जेव्हा पीडित मुलीच्या आईला समजला तेव्हा तिने दत्तवाडी पोलीस ठाण्यात या ३२ वर्षीय नराधमाविरोधात तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply