संजय राऊतांच्या अटकेवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मीदेखील गृहखात्यात…”

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अटक केल्याने शिंदे गटाला आनंद झाल्याचं बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. मात्र ही गटाची भूमिका नसल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना दीपक केसरकर यांनी संजय राऊतांची भाषा अत्यंत चुकीची होती. त्याबद्दल आमदारांच्या मनात राग आहे. पण म्हणून कोणावरही व्यक्तिगत कारवाई व्हावी, तुरुंगात टाकावं अशी त्यांची भावना नाही असं सांगितलं आहे.

“प्रवीण राऊत यांना कित्येक महिन्यापूर्वी अटक झाली होती. त्यानंतरही संजय राऊत यांच्यावर कारवाई न करता, त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी संधी देण्यात आली होती. व्हायरल ऑडिओत ते महिलेला ईडीसमोर आपला जबाब बदलण्यास सांगत होते. मीदेखील गृहखात्यात काम केलं आहे,” असं केसरकर म्हणाले आहेत.

“प्रवीण राऊत यांना कित्येक महिन्यापूर्वी अटक झाली होती. त्यानंतरही संजय राऊत यांच्यावर कारवाई न करता, त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी संधी देण्यात आली होती. व्हायरल ऑडिओत ते महिलेला ईडीसमोर आपला जबाब बदलण्यास सांगत होते. मीदेखील गृहखात्यात काम केलं आहे,” असं केसरकर म्हणाले आहेत.

“संजय राऊतांना कोणीही आपल्या गटात घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर कोणी त्यांना आपल्या पक्षात घेईल असं वाटत नाही. त्यांची भाषा फारच आक्षेपार्ह असते. सत्तेत असणाऱ्या पक्षांविरोधात सातत्याने पत्रकार परिषद घेऊन चुकीचं बोलण्याचं काम त्यांनी केलं. यामुळेच शिवसेना आणि भाजपाचे संबंध दुरावले असतील याची मला खात्री आहे. त्यामुळे शिवसेनेसोबती त्यांची निष्ठा तपासण्याची गरज आहे. त्यांच्यामुळे शिवसेनेला खूप त्रास झाला आहे,” असा आरोप केसरकरांनी केला आहे.

“संजय राऊतांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी कोर्टापुढे सादर करावेत. ते निर्दोष असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ नये. कोणीही दोषी असेल तर कारवाई होणं साहजिक असून आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. कारवाईला घाबरुन कोणीही आमच्याकडे येऊ नये. अशा कारवायांशी आमचा काही संबंध नसतो. आमची लढाई अस्तित्व आणि तत्वासाठी असून आम्ही ती लढत राहणार,” अशी शिंदे गटाची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

संजय राऊतांनी आपल्या वकिलाच्या मार्फत बाजू मांडावी आणि तुरुंगातून बाहेर यावं अशी अपेक्षा आम्ही करत असल्याचंही केसरकरांनी सांगितलं.

संजय राऊतांच्या घऱी सापडलेल्या रकमेतील १० लाखांच्या नोटांवर एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता केसरकरांनी सांगितलं की, “एकनाथ शिंदेंच्या विरोधात काही करायचं असेल आणि त्यासाठी अयोध्येला जायचं असल्याने ते पैसे राखीव ठेवले असल्याची शक्यता आहे. प्रत्येक पैशाचा स्त्रोत दाखवावा लागतो आणि तो संजय राऊतांकडे असणार. ते हुशार, बुद्धिमान असून मुद्दाम असं काही लिहिणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा याच्याशी काही संबंध नाही”.

“आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आमदारांना पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आम्ही त्यांना आमची घरं तपासून पाहा, पैसै सापडणार नाहीत असं आवाहन केलं होतं. कारण हा पैशांसाठी केलेला उठाव नव्हता,” असं केसरकर म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply