संजय राऊतांचा जामीन रद्द होणार?; ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला. मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांचा जामीन मंजूर केला. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळातच ईडीने हायकोर्टात धाव घेत जामीन रद्द होण्याची मागणी केली. आज ईडीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

त्यामुळे संजय राऊत यांचा जामीन रद्द होणार? की त्यांना दिलासा मिळणार याकडेच सर्वांच लक्ष लागून आहे. पीएमएलए न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा, संजय राऊत यांच्याविरोधात आमच्याकडे पुरावे आहेत, असं ईडीने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. आता उच्च न्यायालय नेमका काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

पत्राचाळ प्रकल्पातून संजय राऊतांनी पैसे कमावले, असे ईडीने (ED) म्हटलं आहे. वाधवान बंधूंसोबत संगनमत संजय राऊत यांनी पैसे कमावले, असा या आरोप ईडीने केला आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचंही ईडीने यात म्हटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असाही उल्लेख ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply