मुंबई:  शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का? भोंग्यांवरील कारवाईवर मनसेचा सवाल

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता शिवसेना पक्षाचं मुख्यालय असलेल्या 'शिवसेना भवना'बाहेर लाऊडस्पीकर लावले आहेत. या लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात आली आहे. आज रामनवमीचं औचित्य साधत मनसेनं शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आता मनसेचे हे लाऊडस्पीकर जप्त करत मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या या कारवाईवर मनसेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

याविषयी बोलताना मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी म्हटलंय की, शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का? आज रामनवमी आहे. त्यानिमित्त सेना भवनाबाहेर जर हनुमान चालीसाचे पठाण केले तर यात गैर काय आहे? शिवसेना भवन काय मस्जिद आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply