शिरुरमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

शिरूर - ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा, आज येथे मूक मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. बाजार समितीपासून पोलिस ठाण्यावर काढलेल्या या मूक मोर्चावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे मास्क व हाताला काळ्या फिती बांधल्या होत्या.

आमदार ॲड. अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्ष केशरताई पवार, संचालक ॲड. स्वप्निल ढमढेरे, शिरूर बाजार समितीचे सभापती ॲड. वसंतराव कोरेकर, माजी सभापती शशिकांत दसगुडे, प्रकाश पवार व शंकर जांभळकर, माजी उपसभापती प्रवीण चोरडिया व विश्वास ढमढेरे, शिरूर तालुका सहकारी खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, संचालक सुरेश पाचर्णे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष ॲड. सुदीप गुंदेचा, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक धरमचंद फुलफगर व राजेंद्र गावडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ, युवकचे तालुकाध्यक्ष सागरराजे निंबाळकर, शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवकचे शहर अध्यक्ष रंजन झांबरे, माजी शहर अध्यक्ष अमोल चव्हाण, युवा नेते सागर नरवडे, राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रदीप बारवकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संजय ढमढेरे, शहर अध्यक्ष ॲड. रवींद्र खांडरे, कारेगाव चे उपसरपंच संदीप नवले, सरदवाडीचे उपसरपंच कृष्णा घावटे आदींच्या नेतृत्वाखालील या मूकमोर्चात शिरूर, हवेली, आंबेगाव मतदार संघातून राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले होते.

देशाच्या वाटचालीत अनन्यासाधारण योगदान देणारे आणि सामान्यांच्या जडण घडणीत उभे आयुष्य वेचणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबतची ही घटना महाराष्ट्राला चीड आणणारी आहे, असे आमदार पवार म्हणाले. सर्वसामान्य माणसाबरोबरच; साखर कारखानदारी, शैक्षणिक संस्था, एसटी कामगार या सर्वच घटकांना सातत्याने न्याय देण्याची भूमिका घेणाऱ्या पवार साहेबांसारख्या उत्तुंग नेत्याच्या बाबतची ही घटना निषेधार्ह आहे. हा केवळ एका घरावरील हल्ला नसून पुरोगामी महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विचारधारेवर घातलेला घाला आहे. या भ्याड हल्ल्यामागील मूळ आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध न लागल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा त्यांनी दिला. लोकशाहीला काळीमा फासणारा हा निंद्य प्रकार असून, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा हा भारतीय जनता पक्ष व त्यांच्या बगलबच्च्यांचा डाव असल्याचा आरोप सूर्यकांत पलांडे यांनी केला. पवार साहेब एसटी संबंधीचे मंत्री नसताना, एसटीच्या कुठल्या संघटनेवर पदाधिकारी नसताना त्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचे कारणच काय ? असा सवाल त्यांनी केला. गुणरत्न सदावर्तेवर जरी गुन्हा दाखल केला असला; तरी या भ्याड हल्लाप्रकरणी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, सुधीर मुनगंटीवार, सदाभाऊ खोत यांचीदेखील चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply