शिंदे गटाकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित; मुख्य नेते पदी एकनाथ शिंदे, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखपदी

एकनाथ शिंदे  गटाकडून शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का मानला जातो आहे. शिंदे गटाकडून घोषित करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्यनेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

अशी आहे शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी

या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्यनेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच तानाजी सावंत, विजय नहाटा, यशवंद जाधव, गुलाबराव पाटील यांची शिवसेना उपनेते म्हणून तर आज शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

पक्ष प्रमुखपदी उद्धव ठाकरेच

एकनाथ शिंदे गटाकडून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांचे नाव कायम ठेवण्यात आले आहे. तसा कोणताही प्रस्ताव नव्हता, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply