
इंदापूर : अखंड हरिनामाच्या जयघोषात, टाळमृदंगांच्या गजरात व विठ्ठलनामाच्या जपात, अंथुर्णेकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन शुक्रवारी सकाळी निघालेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा नागवेलीच्या पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीत सायंकाळी मुक्कामी दाखल झाला. सवंदडीच्या माळावर गावातील भजनी मंडळी व ग्रामस्थांनी पालखीचे मोठय़ा उत्साहात स्वागत करत पावसासाठी आळवणी करत पांडुरंगाला साकडे घातले.
सरपंच प्रवीण डोंगरे, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, बाबासाहेब भोंग, पांडुरंग हेगडे, अ?ॅड.सचिन राऊत, गोरख आदिलग, अमोल हेगडे, विठ्ठल नाळे व उपस्थित मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. गावकरी मंडळीसह गावातील सुवर्णयुग पतसंस्था, अष्टविनायक पतसंस्था व अष्टविनायक ग्रुप, केतकेश्वर पतसंस्था, कचरेवाडी व कौठळी ग्रामस्थ यांच्या वतीने मोठय़ा प्रमाणात अन्नदान करण्यात आले. सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेच्या वतीने सुगंधी दूध वाटप केले. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया, ग्रामीण रुग्णालय, गणेश पतसंस्थेच्या वतीने वैद्यकीय सेवा देण्यात आली. पान उत्पादक शेतकऱ्यांनी विडय़ांच्या पानांचे वाटप केले. पालखी मैदानावर पालखी आल्यानंतर पंचक्रोशीतील दहा बारा गावातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, मात्र शांततेत सर्व जण दर्शनाचा लाभ घेत होते. दरम्यान वाटेत शेळगाव फाटा येथे सरपंच रामदास शिंगाडे, उपसरपंच मिच्छद्र भोंग, लालासाहेब पवार, साहेबराव शिंगाङे, विठठल जाधव, हनुमंत मान, मोहन दुधाळ यांनी पालखीचे मनोभावे स्वागत केले. गोतोंडीत सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, ग्रामसेवक बी.के.रणवरे, दिनकर नलवडे यांनी पालखीचे स्वागत केले. ग्रामस्थांनी घरुन आणलेल्या पिठलं- भाकरीचा वारकऱ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला.
पोलीस अधीक्षकही झाले वारकरी
संतांच्या पालख्या हजारो वैष्णवांच्या मांदियाळीसह पंढरपूपर्यंत जात असताना त्यांची मोठी वाटचाल पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून होत असते. हा संतभार विठुरायाच्या पंढरीत पोहोचवण्यासाठी पालखी मार्गावरील सर्वाचाच ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी, विशेषत: पोलीस प्रशासनाचा मोठा कसोटीचा काळ असतो. आपापल्या पद्धतीने सर्वच अधिकारी जबाबदारी घेऊन कर्तव्य बजावत असतात. एका जिल्ह्यातून पालखी पुढील जिल्ह्यात प्रवेश करताना पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांकडून दोन्ही जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा परंपरेनुसार सन्मान केला जातो. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचाही सत्कार झाला आणि या सोहळय़ात तेही वारकरी झाले.
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




