वेळेवर नाश्ता दिला नाही या वादातून झालेल्या गोळीबारात सुन ठार; सासरा फरार

ठाणे : वेळेवर नाश्ता दिला जात नाही या रागातून सास-याने सूनेवर केलेल्या गाेळीबारात सून मृत्यूमुखी पडल्याची घटना ठाण्यातील राबोड़ी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पाेलिस काशीनाथ पाटील याचा शाेध घेताहेत.

काशीनाथ पाटील यांचा वाळूचा व्यवसाय आहे. गुरुवारी त्यांना वेळेत नाश्ता न मिळाल्याने त्यांनी त्यांची सून सीमा पाटील हिच्यावर गाेळीबार केला. त्यामुळे पाटील या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाटील यांचा उपचारा दरम्यान आज (शुक्रवार) मृत्यू झाला. काशीनाथ याचा पाेलिस शाेध घेताहेत अशी माहिती संतोष घटेकर (पोलीस निरीक्षक, राबोडी पोलीस ठाणे) यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *