वेल्हे : रस्त्याच्या वादातून माजी तंटामुक्ती अध्यक्षचा खून

वेल्हे, (पुणे) : सोंडे माथना ( ता.वेल्हे ) येथील रस्त्याच्या वादातून माजी तंटामुक्ती अध्यक्षचा खुन करण्यात आल्याची घटना आज सोमवारी (ता.१४) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद मयत झालेल्या व्यक्तीचा भाऊ मोहन निवृती किन्हाळे यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. किसन निवृत्ती किन्हाळे (वय ५०, रा.सोंडे माथना) असे खुन झालेल्याचे नाव असुन या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी विनायक रामदास किन्हाळे (वय ३९ ,रा.सोंड माथना) यास अटक केली आहे. विनायक किन्हाळे याच्या विरुद्ध वेल्हे पोलीस ठाण्यात भादवी ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक महेश कदम या प्रकरणी तपास करत आहेत. वेल्हे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत किसन किन्हाळे हा सकाळी गुंजवणी नदीच्या तिरावरून घरी येत होते. त्यावेळी विनायक याने किसन याच्यावर लाकडी काठ्यांनी हल्ला केला. यामध्ये किसन यांच्या मानेला कानाला व डोक्याला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला नसरापूर येथे खाजगी हाँस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते परंतु उपचार पुर्वी मयत झाला असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी सोंडे माथना या गावामध्ये नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक फौजदार सुदाम बांदल, औदुंबर आडवाल, विशाल मोरे, अभय बर्गे यांचे, पथक सोंडे माथना येथे घटनास्थळी दाखल झाले आहेत


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply