लोणी काळभोर : तीन पोलीस उपनिरीक्षक बनले सहाय्यक पोलीस निरीक्षक

लोणी काळभोर : महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या ८४६ पोलिस अधिकाऱ्यांना सहायक पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तांतर्गत येत असलेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३ पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. भागवत गौतम शेंडगे, जयंत दत्तात्रय हंचाटे व नितीन बाबुराव शिंदे अशी पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०१२ ला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत शेंडगे, हंचाटे आणि शिंदे उत्तीर्ण झाले. त्यांनी नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात २०१३-२०१४ ला प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर भागवत शेंडगे यांची मुंबई शहर, जयंत हंचाटे यांची पुणे ग्रामीण तर नितीन शिंदे गडचिरोली विभागात पोलीस उपनिरीक्षक पदावर प्रथम सामील झाले. गेल्या काही दिवसांपासून ती रखडलेली होती. अखेर राज्याचे पोलिस महासंचालक यांच्यावतीने मंगळवारी रात्री उशिरा पदोन्नती चे आदेश काढण्यात आले. भागवत शेंडगे यांचा जन्म विठ्ठलवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. शेंडगे हे २०१४ ते २०१९ पर्यंत मुंबई शहर पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. पुणे गुन्हे अन्वेषण विभागामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. जयंत हंचाटे यांचे मूळ गाव सोलापूर शहर आहे. हंचाटे यांनी ३ वर्ष पुणे ग्रामीण पोलीस दलात तर २ वर्ष मुंबई शहर पोलीस दलात कामकाज केले. त्यांची मुंबई लोहमार्ग विभागामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. दरम्यान, नितीन शिंदे यांचे मूळ गाव वडळे (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) हे आहे. त्यांनी गडचिरोली विभागात २०१४ ते २०१८ पर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर शिंदे २०१८ पासून पुणे शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांची कोल्हापूर परीक्षेत्रामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply