Munger : सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. पण या दिवसांमध्ये अशा काही घटना समोर आल्या आहेत, ज्या ऐकून तुमच्या देखील पाया खालची जमीन सरकेल. जर तुम्ही देखील व्हॅलेंटाईन डे बायको किंवा मैत्रिणींला गिफ्ट देत असाल तर ही बातमी नक्की वाचा.
बिहारमध्ये ‘रोज डे’ निमित्त पतीला गुलाब देत प्रेम व्यक्त करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती थेट कायदेशीर अडचणीत सापडली आहे. केवळ गुलाब देण्याचा प्रश्न नसून त्या व्हिडिओमध्ये दिसलेल्या काही गोष्टींमुळे हा प्रकार गंभीर बनला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
नेमकं व्हिडीओमध्ये काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला कंचन देवी पतीला प्रथम गुलाबाचे फूल देते. त्यानंतर ती त्याला एका ग्लासमध्ये दारू ओतून देते आणि दारूची बाटलीही हातात देते असा हा सीन आहे. हा व्हिडिओ तिने स्वतः इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट केला आहे. बिहार राज्यात दारूबंदी कायदा लागू असल्याने सार्वजनिकरीत्या दारूचे सेवन किंवा त्याचे प्रदर्शन हा कायदेशीर गुन्हा ठरतो. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
या प्रकरणाला आणखी वळण मिळाले ते म्हणजे कंचन देवी यांचा आणखी एक फोटो समोर आल्याने ज्यात त्या एका ब्युटी पार्लरमध्ये हातात पिस्तूल घेऊन पोझ देताना दिसत आहेत. या फोटोमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले. व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताच मुंगेर पोलिसांनी हालचाल सुरू केली. मुंगेरचे पोलीस अधीक्षक सैयद इमरान मसूद यांनी घटनेची पुष्टी करत सांगितले की माहिती मिळताच सदर एसडीपीओ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.
पोलिसांनी तातडीने छापा टाकून चौकशी केली असता फोटोमध्ये दिसणारे पिस्तूल दीनदयाल चौक येथील विशाल कुमार नावाच्या व्यक्तीचे परवानाधारक शस्त्र असल्याचे उघड झाले. कंचन देवी यांनी त्या परवानाधारक शस्त्रासोबत फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. जो शस्त्र नियमांचे उल्लंघन मानला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कंचन देवी आणि शस्त्राचे मालक विशाल कुमार यांच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन करणे आणि प्रतिबंधित पदार्थांचे प्रोत्साहन देणे हे कायद्याने दंडनीय असल्याचे एसपींनी स्पष्ट केले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

