रायगड : नव्या वर्षात घर खरेदीचे स्वप्न महागणार; रेडीरेकनरचे दर वाढणार ?

अलिबाग : मागील दोन वर्षांत रेडीरेकनरचे दर वाढले नव्हते. नवीन आर्थिक वर्षापासून ते वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अनेक जण भूर्दंड टाळण्यासाठी तातडीने दस्त नोंदणी करू लागले आहेत. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांत गर्दी वाढलेली दिसते. बांधकाम व्यावसायिकांच्या मते, नव्या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर पाच ते १० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. एकदा नोंदणी शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत दस्ताची नोंदणी करता येते. त्यामुळे जे पक्षकार ३१ मार्च २०२२ पूर्वी दस्त निष्पादन करून ( देणार व घेणार दस्तावर स्वाक्षरी करणे) शासकीय चलनाचा भरणा (मुद्रांक शुल्क व नोंदणी फी) ३१ मार्च २०२२ पूर्वी केल्यास अशा दस्ताची नोंदणी दस्त निष्पादित केल्यापासून पुढील सहा महिन्यांच्या आत आताच्या रेडीरेकनरच्या दरावरच दस्त नोंदणी केली जाऊ शकते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply