राज ठाकरे करणार हनुमान मंदिरात महाआरती; पुण्यात १६ एप्रिलला मनसेकडून सामूहिक हनुमान चालीसा पठण

पुणे: मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात वाद सुरू असताना आता हनुमान जयंतीच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हनुमान चालीसाचे सामूहिक पठण देखील होणार आहे. शनिवारी (१६ एप्रिलला) सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे ही आरती होणार आहे

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगें उतरवा नाही तर मशिदींपुढे स्पीकरवर हनुमान चालीसा लावा असा आदेश मनसैनिकांना दिला होता. तर ठाण्यात झालेल्या सभेत ३ में पर्यंत भोंग उतरविण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. शनिवारी हनुमान जयंती साजरी करण्यासाठी पुण्यातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आलेला असताना आता याच दिवशी राज ठाकरे हे पुण्यात आहेत. दीडशे वर्ष जुन्या खालकर चौकातील मारुती मंदिरात राज ठाकरे हे आरतीसाठी येणार आहेत.

२० वर्षापूर्वी एका अपघातामध्ये मंदिराची भिंत पडली होती, त्यावेळी नव्याने मंदिर बांधताना त्याचे भूमिपूजन देखील राज ठाकरे यांच्याच हस्ते झाले होते. त्यानंतर ते आता आरतीसाठी या मंदिरात येणार आहेत. यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण देखील होणार आहे, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply