राज ठाकरेंना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही; मनसेला जनतेनंच संपवलं: पवारांचा हल्ला

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर भाष्य केलं आहे. काल (१२ एप्रिल) ठाण्यात राज ठाकरेंनी उत्तर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर शरद पवारांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादीला जातीयवादी पक्ष म्हटल्यावरुन पवार म्हणाले की, जो व्यक्ती ५-६ महिन्यांतर आपलं मत व्यक्त करते त्यांना गांभिर्यानं घ्यायची गरज नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही, याबाबत पवार म्हणाले की, राज ठाकरेंनी माझं अमरावतीचं भाषण ऐकावं, २ दिवसांपुर्वीच्या माझ्या भाषणांत मी शिवरायांचा उल्लेख केला आहे असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं आहे. तसेच फुले, आंबेडकर, शाहू, यांचा मला अभिमान आहे, या राज्यात शिवाजी महाराजांबद्दल महात्मा फुले यांनी लिहिले असं पवार म्हणाले. आपल्या हातातील सत्तेता वापर कसा करावा ही भूमिका या तिघांनी मांडली म्हणून त्यांचे नाव घेतो असं पवार म्हणाले.

शरद पवार नास्तिक आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. याबाबत पवार म्हणाले की, मी मंदिरात जातो, पण मंदिरात जाण्याचा गाजावाजा केला नाही. मी बारामतीच्या मंदिरात जातो, राज ठाकरेंनी बारामतीला येऊन बारामतीच्या लोकांना विचारावं असं पवार म्हणाले. तसेच आज प्रश्न होते. महागाई, बेरोजगारी, जिव्हाळा यामध्ये अवाक्षर बोलत नाही, सामान्य जनतेवर एक ही प्रश्न नाही, भाजपबाबत उल्लेख नाही असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

सोनिया गांधींबद्दल पवार म्हणाले की त्या पीएम होऊ नये याबाबत माझं मत जाहीर होतं. आणि त्या पीएम होणार नाहीत हे सोनिया गांधी यांनी स्वतः जाहीर केलं. पीएम पदाबाबत आक्षेप होता ते स्पष्टीकरण झाल्यावर इतर विषय नव्हता म्हणून एकत्र झालो आणि आजही एकत्र आहोत असं पवार म्हणालेत. तसेच आता जे वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे सामाजिक ऐक्याला धक्का द्यायचा प्रयत्न आहे. जनतेला आवाहन सांप्रदायिक मांडणी करत आहे. राज्याची शांतता संकटात आहे, लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पवारांनी केलं.

राज्यातल्या लोडशेडींगबद्दल पवार म्हणाले की, कोळशाबाबत काही प्रश्न आहेत, प्रयत्न चालू आहे. उष्णता लाट मोठी आहे. वीज वापर जास्त होतो. ग्रामीण भागात पंप जास्त वेळ चालवतात. यातून मार्ग निघेल, अपेक्षा करूया असं पवार म्हणाले. तसेच INS विक्रांत प्रकरणीही त्यांनी भाजपर टीका केली आहे. ते म्हणाले की, पैसे गोळा केले आणि पैसे पक्षाला दिले. कितीही पैसे असो पण, लोकांकडून रक्कम आली ती पक्षाकडे का गेली? जवान निधी असतो तिकडे देता आले असती, हे आक्षेपार्ह आहे असं पवार म्हणाले. सोबतच काँग्रेसला दुखवून आम्ही पुढे जाणार नाही, कोणताही फ्रंट असो काँग्रेसला सोबतच घेऊन जाणार असं पवार म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply