रंगपंचमीच्या सणात पिचकाऱ्या उडविण्यात चिमुकले झाले दंग

भल्या सकाळपासूनच चिमुकल्यांनी पिचकऱ्यामध्ये रंग भरून एकमेकांच्या अंगावर उडवत होलीकोत्सव सुरू केला. कुठे रंग, तर कुठे पाणी, फुग्यामध्ये पाणी असा खेळ पाहताना तरुणाईला मोह आवरला नाही. उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, वडाचीवाडी-औताडेवाडी, होळकरवाडी, महंमदवाडी, वडकी परिसरातील तरुणाईच्या रंगपंचमीला उधाण आले होते. गल्ली-बोळामध्ये आणि सोसायट्यांच्या आवारात चिमुकले वॉटरकलरची मुक्त उधळण करीत होते. सूर्यप्रकाशाची सोनेरी किरणे अंगावर झेलत, बादल्यांमध्ये भरलेले सप्तरंगी पाणी पिचकऱ्यामध्ये भरून एकमेकांच्या अंगावर उडविण्यात चिमुकल्या दंग झाल्याचे आजी-आजोबा पाहत रममाण झाले होते. कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मॉर्निंग वॉकवेळी गुलाल, तर कुठे कोरडा रंग लावत रंगपंचमी साजरी केली. दहावी-बारावीची परीक्षा सुरू असली तरी त्याही मुलांनी रंगांची उधळण करीत रंगपंचमीच्या सणाचा आनंद लुटला.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply