युक्रेनला मदत कराल तर…; रशियाची अमेरिका-नाटोला पत्र लिहून धमकी

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने अलीकडेच युक्रेनला 800 दशलक्ष डॉलरची अतिरिक्त लष्करी मदत जाहीर केली आहे. यामुळे रशिया संतप्त झाला असून अमेरिकेने युक्रेनला शस्त्रपुरवठा सुरू ठेवल्यास अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, वॉशिंग्टन पोस्टने या आठवड्यात रशियाने अमेरिकेला पाठवलेल्या डिप्लोमॅटिक नोट सर्वांसमोर आणली. युक्रेनला यूएस आणि नाटोने शस्त्रास्त्रे पाठवल्यास अनपेक्षित परिणाम होऊ शकतात, असा इशारा त्या नोटमध्ये दिलेला आहे. 

रशियाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही युक्रेनचे बेजबाबदार सैन्यीकरण थांबवण्याचे आवाहन अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना करत आहोत, ज्याचा थेट परिणाम प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर होत आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तनुसार या पत्रात म्हटले आहे की शस्त्रे पाठवल्याने अमेरिका आणि नाटो आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. अमेरिकेने युक्रेनला लष्करी मदत म्हणून तोफखाना, आर्मर्ड वाहने आणि हेलिकॉप्टर पाठवण्याची घोषणा केली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका युक्रेनला सातत्याने मदत पाठवत आहे. आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला 2.4 अब्ज डॉलर्सची मदत केली आहे.

युक्रेनने रशियन युद्धनौका काळ्या समुद्रात बुडवली

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तीव्र होत आहे. याच भागात युक्रेनने काळ्या समुद्रात रशियन युद्धनौका बुडवली आहे. याबाबत अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी उत्तर काळ्या समुद्रात बुडालेली रशियन क्षेपणास्त्र वाहून नेणारी नौका युक्रेनने डागलेल्या क्षेपणास्त्राची निशाणा बनली होती, असा अमेरिकेचा विश्वास आहे. तसेच जहाजावर एक क्षेपणास्त्रही पडले होते. युक्रेननेही युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. मात्र, रशियाने हा हल्ला फेटाळून लावला आहे. मात्र जहाजाचे नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले होते.

युक्रेनच्या विविध भागातून रशियन सैनिकांनी माघार घेतल्यानंतर अनेक मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर कीव भागात 900 हून अधिक नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. कीव प्रादेशिक पोलिस दलाच्या प्रमुखांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मृतदेह रस्त्यावर फेकले गेले किंवा तात्पुरते दफन केले गेले आहेत. पोलिसांच्या आकडेवारीचा हवाला देत ते म्हणाले की, गोळी लागल्याने 95 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस प्रमुख म्हणाले की, बुथमध्ये सर्वाधिक 350 हून अधिक मृतदेह सापडले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply